नेवासा – नेवासा तालुक्यातील तरवडी येथील ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य व माजी सरपंच बाबासाहेब घुले यांच्यावर ग्रामसेवकाने आकासबुद्धीने गुन्हा दाखल केल्याचा आरोप करून त्या विरोधात गुरुवार दि. २३ रोजी तरवडी ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून ल निषेध सभा घेतली.
नेवासा तालुक्यातील तरवडी येथील एका रस्त्याच्या अतिक्रमण काढण्याबाबत चर्च वरून झालेल्या वादवादीतून ग्रामसेवक बाबासाहेब मातंग यांनी नेवासा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून वरून विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच बाबासाहेब घुले यांचेसह इतर सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ग्रामसेवक मातंग यांनी आकसबुद्धीने हा गुन्हा दाखल केल्याचे आरोप करून ग्रामस्थांकडून त्या निषेधार्थ गाव बंद ठेवण्यात आले.
यावेळी ग्रामस्थांच्या झालेल्या निषेध सभेत माजी सरपंच बाबासाहेब घुले यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घ्या अशी मागणी करत ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करतात. तसेच वादावादीला खतपाणी घालून गावातील कायदा सुव्यवस्था बिघडवत असल्याचा आरोप करण्यात आला.
निषेध सभेस युवानेते यशवंत पाटील, माजी सरपंच कारभारी तुपे, मोहन गवळी, तरवडीचे विद्यमान सरपंच जालीदंर तुपे, उपसरपंच दत्तात्रय भारस्कर यांनी निषेध व्यक्त केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य शितल क्षीरसागर, स्वप्नाली क्षीरसागर, जनार्धन शिरसागर, सतीश जगदाळे, जालीदंर गवळी, माजी सरपंच आशोक शिरसागर, मोहन पेटे किशोर कन्हेरकर,
महादेव तुपे, शंकर भारस्कर, गोविंद भारस्कर, रामभाऊ दरवडे, दादा सय्यद, भास्करराव ताकटे माजी सरपंच खंडागळे दिवाकर ईंगळे, रावसाहेब नाईक, बाबा भारस्कर, रंगनाथ डुकरे, कचरु घुले, भगवान घुले, रामदास घुले, आशोक बटुळे, भाऊसाहेब बटुळे, रवी निकम, दिलीप तुपे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.