Ganpati festival 2021 : मराठी कलाकारांच्या घरी “श्रीं’चे आगमन….

पुणे – राज्यासह देशभक्त गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. सर्वांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे. 

आपल्या लाडक्‍या मराठी कलाकारांच्या घरीदेखील बाप्पा विराजमान झाला आहे. मराठी अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरीदेखील बाप्पाचे आगमन झाले आहे. 

बाप्पासोबत फोटो शेयर करत स्वप्निलने शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच टाइमपास फेम अभिनेता प्रथमेश परबनेदेखील बाप्पासोबत फोटो शेयर केले आहेत. “जय मल्हार’ फेम अभिनेता देवदत्त नागे यानेसुद्धा गणपती बाप्पाना घरी आणले आहे. 

विशेष म्हणजे त्यांनी यावेळी मास्क घालत करोना नियमांचे भान ठेवले आहे. अभिनेत्री श्‍वेता महाडिकनेसुद्धा आपल्या बाप्पासोबत फोटो शेअर करत सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. “तुझी माझी रेशीमगाठ’ 

मालिकेतील गोड परी म्हणजेच मायराच्या घरीदेखील बाप्पा विराजमान झाले आहेत. “जीव माझा गुंतला’ फेम श्‍वेता अर्थातच प्राजक्‍ता नवनाळेच्या घरीसुद्धाबाप्पा विराजमान झाले आहेत.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.