नवी दिल्ली – कुख्यात गॅंगस्टर छोटा राजन याला उपचारासाठी एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्याच्या तेथील यशस्वी उपचारानंतर त्याला आता पुन्हा तिहार कारागृहात आणण्यात आले आहे.
61 वर्षीय राजन याला पोटाचा विकार आहे, त्यासाठी गेले काही दिवस त्याच्यावर एम्स रूग्णालयात उपचार सुरू होते. मध्यंतरीच्या काळात तो करोनाग्रस्तही झाला होता. पण एप्रिल मध्ये त्याच्यावर त्या संबंधात उपचार करण्यात आल्याने तो त्यातून बराही झाला होता.
राजन याला सन 2015 साली इंडोनेशियातून भारतात हद्दपार करण्यात आले होते तेव्हापासून तो कारागृहात आहे. त्याच्यावर मुंबईतील अनेक गुन्ह्यांसह अन्यही आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. भारतात आणल्यापासून त्याचा मुक्काम तिहारच्याच कारागृहात आहे.