नगर, (प्रतिनिधी) – शहरातुन गणेश जयंती निमित्त एकदंत गणेश मंडळाच्या वतीने भव्य पालखी मिरवुणक काढण्यात आली. तिचे आगमन तोफखान्यात झाल्यावर जंगूभाई तालीमच्या सिद्धेश्वर तरुण मंडळाचे अध्यक्ष राजू जाधव यांनी पालखीचे पूजन करून मिरवणुकीचे स्वागत केले. या वेळी अभिमन्यू जाधव, ज्ञानेश्वर दौंडकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
या पालखी मिरवणुकीत महिलांचा मोठा सहभाnagar newsग होता. मंडळाच्या सर्व पुरुष कुडते व महिला कार्यकर्त्यांनी एक सारख्या साड्या परिधान केल्याने नगरकरांचे लक्ष वेधले. मिरवणुक मार्गावर रांगोळी काढण्यात आली. तर पालखीस फुलांची सजावट करण्यात आली होती. मिरवणुकीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.