मिर्झापूर मालिका आणि फुकरे चित्रपटात मुख्य भुमिकेत असणारा अली फजल आता हॉलिवूड मधिल आपला तिसरा चित्रपट करणार आहे. आपल्या नविन हॉलिवूडपटात तो हॉलिवूडची सुपरहिरो वंडर वुमन म्हणजेच गॅल गॅडोटबरोबर काम करणार आहे.
अली फजलचा हा पहिला हॉलिवूडपट नाही. त्याने याआधी फास्ट अँड फ्युरियस 7 आणि विक्टोरिया अँड अब्दुल या चित्रपटांमध्ये काम केले आहे. विक्टोरिया अँड अब्दुल या चित्रपटात त्याने केलेल्या अभिनयाची प्रचंड स्तुती करण्यात आली होती. तब्बल 23 वेळा ऑस्कर नामांकन मिळवणाऱ्या मेरिल स्ट्रीपने देखील त्याच्या जबरदस्त अभिनय शैलीचे कौतुक केले होते. त्यानंतर अली आता तीसऱ्या बिग बजेट हॉलिवूडपटात काम करताना दिसणार आहे.
अली फजलच्या या आगामी चित्रपटाचे नाव डेथ ऑन द नाईल असे आहे. या चित्रपटात वंडर वुमन फेम अभिनेत्री गॅ गॅडोट मुख्य व्यक्तिरेखा साकारणार आहे. तसेच केनेथ ब्रेनॉग यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
हा चित्रपट प्रसिद्ध कादंबरीकार अगाथा ख्रिस्ती यांच्या कादंबरीवर आधारित आहे. अगाथा ख्रिस्ती या लेखिका आपल्या आश्चर्य चकीत करणाऱ्या डिटेक्टिव्ह कथानकांसाठी ओळखल्या जातात. एका लांबलचक कथानकात अनेक लहान लहान कथा रचून शेवटी त्या सर्वांची एक गाठ बांधायची आणि आश्चर्यचकीत करणारा शेवट करायचा. या अजब गजब लिखाण शैलीच्या जोरावर त्यांनी तब्बल 80 वर्ष वाचकांच्या मनावर राज्य केले आहे.