नेवासा – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निमंत्रणावरून माजी खा. यशवंतराव गडाख यांनी मातोश्रीवर जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे “फटकारे’ हे पुस्तक यशवंतराव गडाख यांना भेट दिली.
ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, आमदार शंकरराव गडाख, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर व प्रशांत पाटील गडाख यावेळी उपस्थित होते. यावेळी यशवंतराव गडाख व ठाकरे यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली.