नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या आज झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर संयुक्त निवेदन प्रसिद्धीस देण्यात आले. दोन्ही नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या जून 2023 मधील ऐतिहासिक अमेरिका भेटीत सहमती साध्य झालेल्या बाबींची अंमलबजावणी करण्यासाठी सुरू असलेल्या भरीव प्रगतीबद्दल कौतुक केले.
विश्वास आणि परस्पर सामंजस्यावर आधारित आपल्या बहुआयामी जागतिक कार्यसूचीच्या सर्व आयामांमध्ये भारत-अमेरिका धोरणात्मक भागीदारीत परिवर्तन घडवण्याचे काम सुरू ठेवण्याचे आवाहन दोन्ही नेत्यांनी केले. स्वातंत्र्य, लोकशाही, मानवी हक्क, समावेशन, बहुलता आणि सर्व नागरिकांसाठी समान संधी ही सामायिक मूल्ये आपल्या देशांच्या सफलतेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत आणि हीच मूल्ये आपले संबंध दृढ़ करत असल्यावर दोन्ही यावर नेत्यांनी पुन्हा भर दिला.
मोदी आणि बायडेन यांनी मुक्त, खुल्या, सर्वसमावेशक आणि लवचिक हिंद -प्रशांत क्षेत्राच्या समर्थनासाठी क्वाडच्या महत्त्वाची पुष्टी केली. भारत 2024 मध्ये यजमानपद भूषवणार असलेल्या पुढील क्वाड शिखर परिषदेत बायडेन यांचे स्वागत करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले. व्यापार कनेक्टिव्हिटी आणि सागरी वाहतूक यासंबधीच्या हिंद-प्रशांत महासागर उपक्रम स्तंभाचे सह-नेतृत्व करण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाचे भारताने स्वागत केले.
बायडेन यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणा होण्यासाठी आणि त्यात भारताला स्थायी सदस्यत्व मिळावे यासाठी पुन्हा आपला ठाम पाठिंबा व्यक्त केला आणि या संदर्भात 2028-29 मध्ये भारताच्या अस्थायी सदस्यत्वाच्या पुनरउमेदवारीचे स्वागत केले.
सेमी कंडक्टरसंदर्भात भारतातील संशोधन आणि विकास वाढवण्यासाठी मायक्रोचिप टेक्नॉलॉजी, इंक.चा अंदाजे 300 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स गुंतवणूक बहु-वर्षीय उपक्रम आणि भारतात संशोधन, विकास आणि अभियांत्रिकी कार्याचा विस्तार करण्यासाठी पुढील पाच वर्षांमध्ये भारतात 400 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स गुंतवणूक करण्याची घोषणा यानिमित्ताने करण्यात आली.
चांद्रयानाचे सुरक्षित लॅन्डिंग आणि आदित्य एल-1 यानाचे यशस्वी प्रक्षेपण याबद्दल बायडेन यांनी पंतप्रधान मोदी आणि बारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या संशोधकांचे अभिनंदन केले.