हडपसर – दरवर्षी G20 चे प्रतिनिधित्व एका देशाला मिळते तेच प्रतिनिधित्व यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपवण्यात आलेले आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो आहे, अशी भावना हडपसर विधानसभा महिला आघाडी अध्यक्षा स्वाती कुरणे यांनी व्यक्त केली.
हडपसर विधानसभा मतदारसंघांमध्ये युवा मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार योगेश टिळेकर, व हडपसरचे अध्यक्ष संदीप दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी नगरसेविका रंजनानानी टिळेकर व संध्या टिळेकर यांच्या नेतृत्वामध्ये कोंढवा येथील इस्कॉन मंदिर याठिकाणी G20च्या लोगोची रांगोळी काढून त्यांचे स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन हडपसर विधानसभा महिला आघाडीच्या अध्यक्षा स्वाती कुरणे यांनी केले होते. यावेळी पुणे शहर उपाध्यक्षा अनुराधा नकाते, माजी नगरसेविका मनीषा कदम, वृषाली कामठे, विजया वाडकर, तसेच वंदना कोद्रे, छाया गदादे, स्मिता गायकवाड, वैशाली पवार, दिपाली माटे, संगीता पाटील, कल्पना शेलार, सारिका मुळे, नीता चव्हाण, मोनिका सिंह व इतर भाजप महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.