नांदेड- पंतप्रधान नरेंद मोदी यांनी आज रात्री 9 वाजता 9 मिनिटं दिवे, टॉर्च, मेणबत्ती लावा. या अंधारातून आपल्याला कोरोनाला लढा द्यायचा आहे, असं आवाहन त्यांनी देशवासियांना केले होते. त्याला भारतीयांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
नांदेड येथे कोरोनाची रांगोळी काढून त्यावर दिवे लावण्यात आले. कोरोनाविरोधात एकत्र येऊन लढू, गो कोरोना गो असं या रंगोळीवर लिहून आम्ही एकत्र लढू, असा संदेश दिला.
दरम्यान, मोदींच्या या आवाहनाचं देशभरात कौतुक होत आहे. सगळ्यांनी आपल्या बाल्कनीत किंवा दरवाज्यात दिवा लावला आणि कोरोनाशी लढण्यासाठी शक्ती एकवटली.