अल्पसंख्यांकांसाठी निधी कमी पडू देणार नाही – शरद सोनवणे

नारायणगाव – राज्यातील मागासवर्गीय, अल्पसंख्यांक, उपेक्षित सर्वच समाजाच्या उन्नतीसाठी राज्य व केंद्र शासनाने स्वतंत्र विभाग सुरू केले आहेत. त्या विभागातील निधी समाजापर्यंत पोहचविणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. याच भावनेतून जुन्नर तालुक्‍यातील मुस्लिम समाजासाठी नारायणगाव, चिंचोली, पारूंडे, आळेफाटा, राजूरी आदी विविध गावांत सुमारे एक कोटी दहा लाखांची विकासकामे पूर्णत्वास येत असल्याचे जुन्नर तालुक्‍याचे आमदार शरद सोनवणे यांनी सांगितले.

वडगाव कांदळी येथे ग्रामपंचायत आणि मुस्लिम समाज यांच्या वतीने अल्पसंख्यांक विकास विभागाकडून मंजूर झालेल्या शादीखाना सभागृहाचे भूमिपूजन समारंभात सोनवणे बोलत होते. यावेळी सरपंच माधुरी निलख, जि. प.चे माजी सदस्य दत्तोबा वाजगे, सचिन निलख, शरद पाचपुते, संतोष वाजगे, किरण वाजगे, मेहबूब काझी, सीमा पाचपुते, शोभा पाचपुते, शाहीन तांबोळी, लालू पठाण, कादर पठाण, जुम्मन पठाण, सिद्दिक इनामदार, जुबेर इनामदार, फरीद इनामदार, विजय नवले उपस्थित होते.

वडगाव कांदळीमधील या शादीखाना सभागृहासाठी निधी कमी पडू देणार नाही. अल्पसंख्यांक विकास विभाग निधीमधून तालुक्‍यात सुरू असलेल्या सर्व कामांचा तसेच नवीन प्रस्तावित कामांना गती देण्यासाठी शासकीय अधिकारी आणि समाज प्रतिनिधी यांची लवकरच बैठक बोलावण्यात येईल. वडगाव कांदळी या गावाला जोडणारे सर्वच रस्ते आमदार सोनवणे यांच्या प्रयत्नातून पूर्ण झाल्याबद्दल उपसरपंच संजय खेडकर यांनी ग्रामस्थांच्या वतीने आमदार सोनवणे यांचे आभार मानले. प्रास्ताविक मेहबूब काझी यांनी केले. सूत्रसंचालन उपसरपंच संजय खेडकर यांनी केले व उस्मान इनामदार व डॉ. निजाम पठाण यांनी आभार मानले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)