पोपट फुंदे यांची हैद्राबाद येथे प्रशिक्षणासाठी निवड

पाथर्डी: सीसीआयटी दिल्ली व महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे यांच्या मार्फत राष्ट्रीय स्तरावर मधापूर हैद्राबाद येथे दिनांक १४ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या ” कळसूत्री बाहुल्यांची शिक्षणातील भूमिका ” या प्रशिक्षणास प्राथमिक शिक्षक पोपट बाबासाहेब फुंदे यांची निवड झाली आहे.

फुंदे हे वायकर वस्ती तालुका पाथर्डी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील एकूण १४ शिक्षकांची या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. पोपट फुंदे यांनी शाळेत राबवलेल्या “नाविण्यपूर्ण शैक्षणिक साहित्य निर्मितीमुळे ” निवड झाल्याचे मत शिक्षणअधिकारी रमाकांत काठमोरे यांनी व्यक्त केले आहे.

तसेच त्यांच्या निवडीबद्दल पाथर्डीचे गटशिक्षण अधिकारी शिवाजी कराड यांच्यासह सहाय्य्क लेखाधिकारी आश्रुबा नरोटे व ग्रामस्थ वायकरवस्ती आदींनी फुंदेंचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान फुंदे हे आपल्या विविध सामाजिक उपक्रमामुळे सर्वत्र परिचित आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.