पुणे (प्रतिनिधी) – आर्थिक फसवणुक, धमकी, खंडणी असे वेगवेगळे गुन्हे दाखल असलेला व माेक्का गुन्हयातील फरार पत्रकार देवेंद्र जैन यास पुणे पाेलीसांचे गुन्हे शाखेने मंगळवारी अटक केली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता व बांधकाम व्यवसायिक रवींद्र बऱ्हाटे यास पाेलीसांनी नुकतेच अटक केल्यानंतर जैन लवकरच पाेलीसांना मिळून येणार अशी शक्यता वर्तविण्यात येत हाेती.
पुण्यातील विविध वृत्तपत्रात देवेंद्र जैन काम करत हाेता. यादरम्यान त्याच्यासह रविंद्र बऱ्हाटे, बडर्तफ पाेलीस शैलेश जगताप, परवेझ जमादार, सांगलीचे पत्रकार संजय भाेकरे यांच्यासह साथीदारांवर विविध पाेलीस ठाण्यात खंडणी, फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले. त्यानंतर मागील सात महिन्यांपासून देवेंद्र जैन पसार झाला हाेता, यादरम्यान त्याचेवर माेक्काची कारवाई पाेलीसांनी करुन त्यास फरार ही घाेषित केले.
पाेलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी बऱ्हाटे व जैन यांना अटक करण्यासाठी एका विशेष पथकाची नेमणूक केली हाेती. सदर पथकाने राज्यातील विविध भागात छापेमारी करुन त्यांचा शाेध घेतला हाेता तसेच दाेघांचे कुटुंबियांचा गुन्हयातील समावेश ही पाेलीसांनी स्पष्ट केला.
अखेर बऱ्हाटे आणि जैन पुणे पाेलीस आयुक्तलयात शरण आल्यानंतर पाेलीसांनी त्यांना अटक केली आहे. फरार काळात जैन कुठे राहत हाेता, काेणाचे संर्पकात हाेता, त्यास मदत काेणी केली, त्याचे अन्य साथीदार काेण आहे याबाबत पाेलीस अधिक चाैकशी करत आहे.