पुणे : जिवे ठार मारण्याचे उदेशाने कोयत्याने मारहाण करुन पळून गेलेल्या तीघा आरोपींना खेडशिवापूरला पकडण्यात आले. ही कामगिरी भारती विदयापीठ पोलीसांनी केली. अमित ऊर्फ हमिद चांदपाशा शेख (गोकुळनगर,कात्रज ), विदयाधर ऊर्फ पप्पु सनातन नायक (कात्रज ) प्रसाद विजय गायकवाड (गोकुळनगर,कात्रज ) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
कात्रज- कोंढवा रस्त्यावर 5 नोव्हेंबर राजी शिव कैलास हॉटेलसमारे फिर्यादी किशोर रामचंद्र मोरे ( रा.गोकुळनगर, कात्रज ) याचा मित्र रुपेश काकणु सगट (रा आंबेगाव ) यास शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याच्या उददेशाने लाथा बुक्क्यांनी व लाकडी बाबुने डोक्यात व पाठीवर मारहाण करुन गंभीर जखमी केले होते.
याप्रकरणी अमित शेख व त्याच्या दोन साथीदार यांचेविरुध्द भारती विदयापीठ पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला होता तपास पथंकाचे अधिकारी नितीन शिंदे आरोपींचा शोध घेत असताना तपास पथकांतील अंमलदार सचिन पवार, अभिजीत जाधव व राहूल तांबे यांना एक खबर मिळाली. त्यानूसार तिघांना खेडशिवापूर येथून ताब्यात घेण्यात आले. आरोपींना पोलीस उप निरीक्षक अविनाश ढमे यांनी गुन्हयात अटक करुन त्याची पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे.
सदरची कामगिरी उपायुक्त सागर पाटील,सहायक आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक, संगिता यादव, विजय पुराणिक यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक नितीन शिंदे व तपास पथकांचे अंमलदार रविन्द्र भोसले, रविंद्र चिप्पा, गणेश सुतार, सचिन पवार, निलेश खोमणे, योगेश सुळ, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, गणेश शेंडे, राहूल तांबे, धनाजी धोत्रे, नवनाथ खताळ, सचिन गाडे, आशिष गायकवाड, विक्रम सावंत, जगदीश खेडकर, शिवदत्त गायकवाड, प्रविण पिसाळ यांनी
केली आहे.