पुणे- करोनाच्या पार्श्वभूमीवर दि.15 सप्टेंबरपर्यंत शिवभोजन थाळी मोफत देण्याचे राज्य शासनाचे आदेश होते. पण, आता शासनाने योजनेस मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे मोफत शिवभोजन थाळी सुरूच राहणार आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांत मिळून 11 ठिकाणी ही थाळी उपलब्ध करून दिली होती. वाढता प्रतिसाद लक्षात घेता दोन्ही ठिकाणी सध्या 39 केंद्रे आहेत. शिवभोजन थाळ्यांचा लाभ प्राधान्याने मजूर, रुग्णांचे नातेवाईक, निराधार, अल्प उत्पन्न गटातील लोकांना देण्यात येत आहे.