खडकवासला (पुणे) – मालखेड (ता.हवेली) येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त राबविण्यात येत असलेल्या हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत ग्रामपंचायतीच्या वतीने मोफत झेंडा वाटप करण्यात येत आहे. शासनाच्या सुचना व नियमाप्रमाणे सर्व रहिवाशांना आपल्या घरावर सन्मानपूर्वक तिरंगा लावण्याचे आवाहन ग्रामपंचायती कडून करण्यात आले.
हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत सर्व रहिवाशांना मोफत झेंडा देण्याचा ग्रामपंचायतीच्या बैठकीत निर्णय करण्यात आला होता.
तसेच १२ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १०.०० ते सायं ५.०० या वेळेत ग्रामपंचायतकडून घरोघरी झेंडा वाटप करण्यात येणार आहे.
यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य नंदा लालदास जोरी, अक्षदा अनिकेत खाटपे, तायरा अहमद खान, सुजाता तुकाराम खाटपे, चेतन सदाशिव भालेराव, गौतम परशुराम खाटपे, विशाल दिलीप गो-हे आणि ग्रामपंचायत मालखेड प्रशासक नवनाथ कारंडे, ग्रामसेवक रविंद्र सोनवणे, पोलीस पाटील सुप्रिया जोरी, माजी उपसरपंच कविता खाटपे, राकेश जोरी, मनोहर खाटपे अहमद खान, सदाशिव भालेराव, अनंता चरवड,अशोक खाटपे, भरत खाटपे, नंदकुमार चरवड, रमेश गो-हे, विकास खाटपे, श्री काळभैरवनाथ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नंदकुमार बारवकर, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राकेश बादशहा, अंगणवाडी कार्यकर्ती बाळुताई भोसले, ग्रामपंचायत संघणक आॅपरेटर सुवर्णा राहुल जोरी, आशा कार्यकर्ती सुवर्णा संजय जोरी, ग्रामपंचायत कर्मचारी बाळासाहेब खाटपे आदि उपस्थित होते.
“आजादी का अमृत महोत्सवाअंतर्गत आज मालखेड येथे हर घर झेंडा उपक्रम अंतर्गत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते त्यास ग्रामस्थांचा उत्कृष्ट सहभाग मिळाला. या कार्यक्रमाचे प्रचार प्रसिद्धीसाठी माध्यमिक व माध्यमिक शाळेच्या मुलांची प्रभात फेरी काढण्यात आली व जनजागृती करण्यात आली.”
– नवनाथ कारंडे, प्रशासक ग्रामपंचायत मालखेड