ठाणे : सध्या मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल अशा विविध प्रकारची माध्यमे संक्रमणावस्थेतून जात असून त्यांनी तत्त्व आणि ध्येय न बदलता जनतेपर्यंत सत्य पोहोचवावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
एका वृत्तपत्राच्या ठाणे येथील नूतन कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले, माध्यमांचं स्वरूप बदलत आहे. डिजिटल माध्यमातून मजकूर मोठ्या प्रमाणावर येत असून या सर्व बदलांमुळे माध्यमांची वेगळं जग निर्माण झाले आहे. संक्रमणावस्थेतून जाणाऱ्या विविध माध्यमांपुढे तत्त्व आणि ध्येय टिकवितानाच समाजाच्या विचाराला दिशा देण्याचं काम केलं पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी वाचन संस्कृती जपण्याचे आवाहन करतानाच सोशय मीडियाच्या युगात मुद्रित माध्यमांचे महत्त्व अधोरेखित केले.