पिंपरी -चिखली, जाधववाडी येथील आधार कॉर्पोरेशन आणि चॉईस डेव्हलपर यांनी सोसायटीधारकांची फसवणूक केली आहे, या डेव्हलपरने ग्राहकांना आश्वासन दिलेल्या सुविधा न देता फसवणूक केल्याचा आरोप एव्हरेस्ट प्लाझा सहकारी संस्थेचे अध्यक्ष विनोद शिरसाठ यांनी केला आहे.
याबाबत शिरसाठ म्हणाले की, “”आधार कॉर्पोरेशन आणि चॉईस डेव्हलपर यांनी जाधववाडी येथे दहा मजली दोन इमारतींची स्किम उभारली. दोन्ही इमारतीमध्ये रहिवासी ग्राहकांनाच हे फ्लॅट विकण्यात येणार आहेत, असे बिल्डरने सांगितले होते. मात्र, बी विंगमध्ये दोन फ्लॅट व्यावसायिक वापरासाठी देण्यात आले आहेत. याचा त्रास सोसायटीतील रहिवाशांना होत आहे.
दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी 24 पार्किंग कमी आहेत. 268 दुचाकींची पार्किग असल्याचे सांगून फक्त 70 दुचाकी बसतील एवढीच पार्किंग देण्यात आली आहे. मेटेन्सचा आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या सुमारे साडेतीन कोटी रूपयांचा बिल्डरने हिशोब दिला नाही. रेरा नियमाप्रमाणे ओपन पार्किंग विकता येत नसतानाही ओपन पार्किंगचीही विक्री करून त्याची पोच पावती दिली नाही. कामही निकृष्ट दर्जाचे झाले आहे,असे आरोप शिरसाठ यांनी केले आहेत.
आम्ही ऑडिट करून सर्व रक्कम परत केली आहे. फ्लॅट बुक केल्यानंतर ग्राहकांना प्लॅननुसार मार्किंग करून पार्किंग दिली आहे. काम पूर्ण झाल्यानंतर आम्ही सभासदांच्याआमच्याकडे स्वाक्षरी झाल्याचे लेटर हेड देखील आहे. हे सर्व आरोप निराधार आहेत.
– मनोज पटेल, बिल्डर चॉईस डेव्हलपर