पॅरिस – पॅरिसमध्ये झालेल्या सामन्यात जागतिक विजेत्या फ्रान्सला पराभवाचा सामना करावा लागला. आंतरराष्ट्रीय मानांकनात (रॅंकिंग) तब्बल 55 व्या स्थानावरील फिनलंडने जगातील नंबर-1 टीम फ्रान्सला त्यांच्या घरच्या मैदानावर 2-0 ने हरवले.
पॅरिसच्या स्टेड डी फ्रान्स स्टेडियममध्ये फिनलंडकडून मार्क्स फॉर्सने 28 व्या व वलाकारीने 31 व्या मिनिटाला गोल केला. फ्रान्सच्या टीममध्ये मॅंचेस्टर युनायटेडचा पोग्बा, एव्हर्टनचा डिगने व चेल्सीचा गिराऊडदेखील होते.
हा फिनलंडचा फ्रान्सवर पहिला विजय ठरला. या दोन संघांत वर्ष 1960 मध्ये पहिला सामना झाला होता. आतापर्यंतच्या आठही सामन्यांमध्ये फ्रान्सने विजय मिळवला होता.