देऊळगावराजे-दौंड तालुक्याच्या पूर्व भागात करोना व्हायरसने आता शिरकाव केला आहे. आलेगाव येथील एकाच कुटुंबातील चार जणांना करोनाची लागण झाल्याचे रिपोर्ट आले असल्याची माहिती दौंड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी दिली.
आलेगाव येथील हे कुटुंब नाशिक येथे गेले होते. येथे आल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागल्यामुळे त्याची करोनाची टेस्ट केली. यात त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये एक महिला आणि तीन पुरुषाच्या समावेश आहे.