बेल्हे : निमगावसावा (ता.जुन्नर) या गावात करोनाने शिरकाव केला असून गावातील ९ महिन्याच्या २२ वर्षीय गर्भवती महीलेचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे. डीलेव्हरीची तारीख जवळ आली म्हणुन तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र निमगावसावा या ठीकाणी गेली असता तेथील डाॅक्टरांनी पुढे जाण्याचा सल्ला दिला.
महीलेला नारायणगाव ग्रामीण रूग्णालय व पुढे उपजिल्हारूग्णालय मंचर या ठीकाणी नेण्यात आले. मंचर येथे (दि. १७) रोजी त्या महीलेचा स्वब घेण्यात आला असता आज (दि.१९) रोजी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती निमगाव सावा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहायक संभाजी घोडे यांनी दिली.
जुन्नर आरोग्य विभागाने या महिलेला पुढील उपचारासाठी पुण्याला पाठवण्यात आल आहे. गावातील सर्व नागरिकांनी विनाकारण फिरू नये तसेच सर्वांनी मास्कचा वापर करावा असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांनी केले आहे.