सिंहगड पोलिस, ग्रामीण पोलिस आणि गुन्हे शाखेची कारवाई…
पुणे(प्रतिनिधी) – नऱ्हे येथील हॉटेल व्यवसायीकाच्या खुन प्रकरणी सिंहगड पोलिस आणी ग्रामीण पोलिस आणी गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत चौघांना जेरबंद केले आहे. घटनेच्या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेज व रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला.
आकाश नितीन दामगुडे( 26, रा.नांदेडसिटी, सिंहगड रस्ता), संतोष रामचंद्र नात्की(28,रा.कात्रज), गणेश तुकाराम गवारे(22,रा.अप्पर इंदिरानगर), सुधीर राजाराम कामठे(रा.कुसगाव, ता. भोर) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
नऱ्हे येथे 12 जून रोजी सुनिल बारकु लांगोरे(40,रा.नऱ्हे) या हॉटेल व्यवसायीकाचा कोयत्याने सपासप वार करत खुन करण्यात आला होता. आरोपींचा शोध घेण्यासाठी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले. तसेच आरोपींच्या पळूण जाण्याच्या मार्गावरीलही सीसीटीव्ही फुटेत तपासण्यात आले. पोलिस कर्मचारी श्रीकांत दगडे यांनी याचे विश्लेषण करुन आरोपींचा शोध घेतला.त्यांना अटक करण्यात आले असून खुनाच्या कारणाचा शोध घेण्यात येत आहे. प्राथमिक तपासात आर्थिक व्यवहारातून खुन झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ही कारवाई अपर पोलिस आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, सहायक पोलिस आयुक्त पी.डी.राठोड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकिशोर शेळके, पोलिस निरीक्षक सुनिल ताकवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक चेतन थोरबोले, पोलिस उपनिरीक्षक सुधीर घाडगे, पोलिस कर्मचारी दत्ता सोनवणे, दयानंद तेलंगे पाटील, श्रीकांत दगडे, पुरुषोत्तम गुन्ला, सचिन माळवे, योगेश झेंडे, हरीष गायकवाड, बालाजी जाधव, किशोर शिंदे, अविनाश कोंडे, राहुल शेडगे, राजेश गोसावी, यशवंत ओंबासे, मोहन भुरुक, राजेंद्र सुर्वे यांच्या पथकाने केली.