सेउल – दक्षिण कोरियाच्या दोन प्रशिक्षणार्थी विमानांचा हवेत भीषण अपघात झाला आहे. विमानांची टक्कर होऊन झालेल्या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हा अपघात सैचओन एयरबेसच्या जवळ झाला आहे.
दक्षिण कोरियाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार दक्षिणपूर्व शहर सैचओनच्या एयबेसजवळ दुपारी 1.35 वाजताच्या सुमारास केटी-1 विमान हवेत एकमेकांना धडकले. यात 4 जणांचा मृत्यू झाला असून एक वैमानिक जखमी झाला असल्याची माहिती मिळाली आहे. परंतु वायुसेनेकडून अपघाताबाबत कोणतीही अधिकृत सूचना दिली नाही.
विमान दुर्घटनेतील वैमानिकांनी सुरक्षित बाहेर येण्याचा प्रयत्न केला होता की नाही याचा तपास केला जात आहे. केटी-1 एयरक्राफ्ट दोन सीट असलेले विमान असल्याचे सांगण्यात येत आहे.