नागपूर – माजी पंतप्रधान नरसिंहराव यांचे ओएसडी राम खांडेकर यांचे काल रात्री नागपुरात दीर्घ आजाराने निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे प्रिसिंपल सेक्रेटरी म्हणूनही काम केले आहे.
नरसिंहराव हे महाराष्ट्रातल्या रामटेक लोकसभा मतदार संघातील खासदार होते त्यावेळी त्यांनी खांडेकर यांना आपल्या मतदार संघातील व्यवस्था पाहण्यासाठी नियुक्त केले होते. 1991 साली जेव्हा नरसिंहराव हे पंतप्रधान झाले त्यावेळी त्यांनी खांडेकरांना दिल्लीत नेले व त्यांची तेथे ओएसडी म्हणून नियुक्ती केली.
नरसिंहराव यांचे ते निकटवर्तीय म्हणून गणले जात होते. त्यांच्या मृत्युपर्यंत ते त्यांच्या समवेत होते. त्यांनी आपल्या सेवाकाळातील अनुभवाबद्दल वृत्तपत्रांतून अनेक वेळा लेखन केले आहे. त्यांच्या मागे एक मुलगा, सून आणि दोन नातवंडे असा परिवार आहे.