- 314 बाधित
- 18 मृत्यूंची नोंद
पिंपरी – कमी झालेली दैनंदिन रुग्णसंख्या बुधवारी वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्या तीनशेपेक्षा कमी होती. परंतु बुधवारी शहरात 314 करोनाबाधित झाली आहे. तर 300 जण करोनामुक्त झाले आहेत. तसेच 18 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
बुधवारी (दि. 9) शहरात 314 जणांना करोनाची लागण झाली. तर शहराबाहेरील रुग्णांची आकडेवारी पालिका प्रशासनाने प्रसिद्ध केली नाही. आजपर्यंत शहरातील 2 लाख 52 हजार 978 जणांना करोनाची लागण झाली आहे. आज दिवसभरात 18 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामध्ये शहरातील 9 व शहराबाहेरील 9 जणांचा समावेश आहे.
दिवसभरामध्ये 300 रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 45 हजार 840 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 3299 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये तपासणीसाठी दाखल केले आहे. सद्यस्थितीत शहरातील महापालिकेची रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 1769 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 1176 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 2945 इतकी आहे.
जिल्हा रुग्णालयात करोनाने एकाचा मृत्यू
सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात बुधवारी (दि. 9) करोनाने हिंजवडी येथील 70 वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू झाला. तर, करोनामुक्त झालेल्या चौघांना घरी सोडण्यात आले.
रुग्णालयातून 3 महिला आणि एक पुरुष रुग्ण बरे होऊन घरी परतले. औंध आणि पुणे येथील ते रहिवाशी आहेत. पिंपरी-चिंचवड येथील एका करोना संशयित रुग्णाला आज उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयात सध्या 18 जणांवर उपचार सुरू आहे. त्यातील 12 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयातून आत्तापर्यंत एकूण 1 हजार 366 रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर, 352 रुग्णांना उपचारासाठी अन्य रुग्णालयात हलविले आहे. एकूण 350 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.