मलेशिया – मलेशियाच्या सर्वोच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान नजीब रझाक यांची भ्रष्टाचार प्रकरणात 12 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा कायम ठेवली आहे. यामुळे नजीब रझाक यांना मोठा धक्का बसला असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, कारावासाची शिक्षा भोगणारे ते देशाचे पहिले माजी पंतप्रधान ठरले आहेत.
फेडरल न्यायालयाच्या पाच सदस्यीय पॅनेलने म्हटले आहे की, उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा योग्य आहे. नजीब यांचे अपील कोणत्याही गुणवत्तेशिवाय आहे. न्यायालयाने नजीब यांना भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरवून 12 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. नजीब यांची अंतिम याचिकाही फेटाळण्यात आल्याने त्यांना ताबडतोब शिक्षा भोगावी लागणार आहे.
दरम्यान, 2009 मध्ये सत्तेत आल्यानंतर नजीब यांनी एक विशेष विकास निधी स्थापन केला होता. या निधीत मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला.
या प्रकरणी तपासादरम्यान, तत्कालीन पंतप्रधान नजीब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या निधीतून किमान सुमारे 450 दशलक्ष डॉलरचा आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचे आढळून आले. या घोटाळ्याने अमेरिका आणि इतर अनेक देशांमध्ये चौकशी सुरू केली. यानंतर 2018च्या निवडणुकीत नजीबचे सरकार कोसळले.