माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह  यांचा पाय आणखी खोलात गेला आहे.कारण  परमबीर सिंह यांच्यासह सहा जणांवरील भ्रष्टाचाराचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांनी बुधवारी सात सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. त्याचे अध्यक्ष पोलीस उपायुक्त स्तरीय अधिकारी असणार आहेत.

काही दिवसांपूर्वी बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह आठ जणांवर मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असतानाच त्यापाठोपाठ आणखी एक खंडणीचा गुन्हा परमबीर सिंह, पोलिस उपायुक्त पराग मणेरे यांच्यासह पाचजणांवर ठाणे शहरातील कोपरी पोलिस ठाण्यात दाखल झाला होता.

बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह आठ जणांविरोधात मरिन ड्राइव्ह पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आमदार गीता जैन यांचा भाऊ संजय पुनामिया आणि सुनील जैन या दोघांना अटक करण्यात आली. दरम्यान, हे जुने प्रकरण पुन्हा उकरून काढले असल्याची चर्चा होती.

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण, पोलीस निरीक्षक आशा कोरके, नंदकुमार गोपाळे, पोलीस अधिकारी श्रीकांत शिंदे आणि संजय पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बांधकाम व्यावसायिक शाम सुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.