कुआलालांपूर, (मलेशिया) :– मलेशियातील 1 मलेशिया डेव्हलपमेंट बरहार्ड सरकारी निधीतील लक्षावधी डॉलरच्या अपहाराच्या प्रकरणी मलेशियाचे माजी पंतप्रधान नजीब रझाक यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
नजीब यांच्यावर “1एमडीबी’तील भ्रष्टाचाराशी संबंधित असल्याचे आरोप आहेत. त्यातील एका प्रकरणी अंतिम सुनावणीमध्ये दोषी ठरवले गेल्यामुळे त्यांना 12 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्या प्रकरणी लेखापाल अहवालामध्ये छेडछाड केल्याच्या आरोपातून त्यांना निर्दोष ठरवण्यात आले आहे.
नजीब यांनी “1एमडीबी’च्या लेखा अहवालामध्ये छेडछाड करण्यासाठी पंतप्रधान आणि अर्थ मंत्री म्हणून आपल्या पदाचा गैरवापर केल्याचे कोणतेही ठोस पुरावे सरकारी पक्षाला सादर करता आले नाहीत, असे नजीब यांच्या वकिलांनी हायकोर्टाबाहेर सांगितले.
#RussiaUkraineWar : रशियाकडून पुन्हा एकदा आण्विक संघर्षाचा इशारा
काय होतं प्रकरण….
नजीब 2009 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर काही महिन्यांनी 1एमडीबी विकास निधी स्थापन करण्यात आला होता. नजीब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून या निधीतील 4.5 अब्ज डॉलरच्या निधीचा अपहार केला. हा निधी अमेरिका आणि अन्य देशांमधील बॅंकांमध्ये वळवण्यात आला आणि त्याचा विनियोग हॉलिवूडणमधील चित्रपट निर्मिती, आलिशान हॉटेल खरेदी आणि प्रवासी बोटींच्या खरेदीसाठी केला गेला, असा आरोप होता.