कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बंगारप्पा यांचे पुत्र कॉंग्रेसमध्ये

बंगळूर  – कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री दिवंगत एस.बंगारप्पा यांचे पुत्र मधू बंगारप्पा यांनी शुक्रवारी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. काही महिन्यांपूर्वी जेडीएसला रामराम ठोकणारे मधू माजी आमदार आहेत. कॉंग्रेसचे प्रभारी रणदीप सुर्जेवाला, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार यांच्या उपस्थितीत मधू यांच्या प्रवेशाचा सोहळा झाला.

जेडीएसमध्ये असताना मधू त्या पक्षाच्या प्रदेश कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत होते. त्या पक्षाला रामराम ठोकल्यानंतर त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला होता.

कर्नाटकात 2018 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जेडीएसचे उमेदवार असणारे मधू पराभूत झाले. कुमार बंगारप्पा या भाजपने उमेदवारी दिलेल्या भावानेच त्यांना पराभूत केले. त्याचवर्षीच्या लोकसभा पोटनिवडणुकीतही जेडीएसचे उमेदवार म्हणून मधू यांना अपयश आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.