रांची – झारखंड राज्य क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष व बीसीसीआयचे माजी सचिव अमिताभ चौधरी यांचे येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते झारखंडच्या लोकसेवा आयोगाचेही अध्यक्ष होते.
महेंद्रसिंह धोनीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या शुभारंभापासून त्याच्या यशस्वी वाटचालीत चौधरी यांचेही मोलाचे योगदान होते. रांची येथील संतेविता रुग्णालयात वयाच्या 62 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय क्रिकेटशी संबंधित सर्व क्रिकेटपटू तसेच आजी माजी पदाधिकारी यांनी चौधरी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.