नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे वयाच्या 59 व्या वर्षी निधन झाले. मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याची बातमी एएनआय या वृतसंस्थेने दिली आहे.
Former Australian cricketer and commentator Dean Jones passes away at 59: Star India
(Pic courtesy: Dean Jones Twitter) pic.twitter.com/T4c7woh44x
— ANI (@ANI) September 24, 2020
डीन जोन्स हे त्याच्या काळातील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू होते. डीन जोन्सने ऑस्ट्रेलियाकडून 52 कसोटी, 164 एकदिवसीय सामने खेळले. डीन जोन्स यांनी 10 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत 52 कसोटी सामने खेळले आणि 48 पेक्षा अधिक स्ट्राईक रेटने 3631 धावा केल्या. तसेच 164 एकदिवसीय सामन्यात 6068 धावा देखील त्याच्या नावे आहेत. डीन जोन्स यांनी दोन्ही प्रकारच्या क्रिकेट प्रकारात एकूण 18 शतके आणि 60 अर्धशतके झळकावली.
आयपीएल 2020 मध्ये समालोचन करत होते..
59 वर्षीय डीन जोन्स हे एक प्रसिध्द क्रिकेट समालोचक देखील होते. डीन जोन्स यांचा आयपीएल 2020 मध्ये इंग्रजी समलोचकाच्या पॅनलमध्ये समावेश होता. मुंबई विरुद्ध केकेआर संघातील सामन्यात काल डीन जोन्स यांनी समालोचन केले होते. त्याचे जाणे क्रिकेट विश्वासाठी एक मोठे नुकसान आहे.
रवी शास्त्रींकडून श्रध्दांजली…
Really shocking to lose a colleague and a dear friend – Dean Jones. Gone so young. Condolences to the family and may his soul rest in peace #RIPDeanJones 🙏 – @cricketcomau pic.twitter.com/pckNBow5Sv
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) September 24, 2020
डीन जोन्सच्या निधनानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ट्वीट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.