Forex Reserves – 26 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलन साठा 5.91 अब्ज डॉलरने वाढून 616.733 अब्ज डाॅलर झाला आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने आज म्हणजेच शुक्रवारी ही माहिती दिली. 19 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात, देशाचा एकूण चलन साठा 2.795 अब्ज डॉलरने घसरून 616.143 अब्ज डाॅलर झाला होता.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, ऑक्टोबर 2021 मध्ये, देशाच्या परकीय चलनाचा साठा 645 अब्ज डॉलरच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला होता. गेल्या वर्षीपासून जागतिक घडामोडींच्या दबावामुळे रुपयाचा विनिमय दर राखण्यासाठी केंद्रीय बँकेने राखीव निधीचा वापर केला. त्याचा परिणाम चलन साठ्यावर झाला आहे.
परकीय चलन मालमत्तेत वाढ –
रिझर्व बँकेच्या साप्ताहिक आकडेवारीनुसार, परकीय चलन साठ्याचा महत्त्वाचा भाग असलेली परकीय चलन मालमत्ता 26 जानेवारीला संपलेल्या आठवड्यात 2.89 अब्ज डाॅलरने वाढून 546.144 अब्ज डाॅलर झाली आहे.
डॉलरमध्ये व्यक्त केलेली परकीय चलन मालमत्ता यूरो, पाउंड आणि येन यांसारख्या गैर-यूएस चलनांमधील हालचालींचे परिणाम विचारात घेतात.
सोन्याचा साठा कमी झाला –
RBI च्या म्हणण्यानुसार, सोन्याच्या साठ्याचे मूल्य 26.9 कोटी डाॅलरने वाढून 47.481 अब्ज डाॅलर झाले आहे. 19 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात, देशातील सोन्याचा साठा 3.4 कोटी डाॅलरने कमी होऊन 47.212 अब्ज डाॅलर झाला होता.
एसडीआरही वाढला –
स्पेशल ड्रॉइंग राइट्स (SDRs) 2.7 कोटी डाॅलरने वाढून 18.248 अब्ज डाॅलर झाला झाले. तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडे ठेवलेला देशाचा चलन साठा 6 दशलक्ष डॉलर्सने वाढून 4.86 अब्ज डॉलरवर पोहोचला.