मुंबई – फिल्म स्टार अभिनेत्री अनेकदा फिगर मेंटेन ठेवण्यासाठी मेहनत घेताना दिसतात. यासाठी त्या अनेकदा आपला आहार मेंटेन करताना दिसतात. कितीही हालाकीची परिस्थिती आली तरी अभिनेत्री आपलं डायट नेहमीच फॉलो करताना दिसतात. अभिनेत्री शेहनाज गिल देखील त्यापैकीच एक. मात्र नुकतच शेहनाज तिच्या नॉनव्हेज खाण्याच्या खुलाश्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे.
शेहनाज म्हणते लहानपणी कधीतरी चुकून तीन नॉनव्हेज खाल्लं असेल. त्यानंतर तिला कधीही नॉनव्हेज खाण्याची इच्छा झाली नव्हती. मात्र काही दिवसांपूर्वी डॉक्टरांनी शेहनाजला नॉनव्हेज खाण्याचा सल्ला दिला होता कारण ती आजारी होती. या शोमध्ये बोलताना शेहनाजने याबाबत खुलासा केला.
शेहनाज म्हणाली “मला सी 3 सी 5 ची समस्या आहे त्यामुळे मी माझी मान जास्त हलवू शकत नाही. मी शाकाहारी असल्यामुळे माझ्या मानेवर ताण आला होता. त्यानंतर डॉक्टरांनी मला मांसाहार करायला सांगितले. मी बरी होईपर्यंत मला मांसाहार करण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यासाठी मला रोज नॉनव्हेज सूप प्यावे लागत होते.”
अचानक शरीरासाठी नॉनव्हेज सुरु करायला लागल्याने मला खूप वाईट वाटायचे. मनाला खूप दुःख व्हायरचे असंही शेहनाजने यावेळी सांगितले. साऊथ स्टार ब्रह्माकुमारी बीके शिवानी शेहनाजच्या एका शोमध्ये आली असता त्यांच्यामध्ये विविध विषयांवर गप्पा रंगल्या होत्या. यावेळी शेहनाजने हा नॉनव्हेजचा किस्सा सांगितला.