शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला यांच्या “शोना शोना’ गाण्याने सोशल मीडियावर खूपच प्रसिद्धी मिळविली होती. तसेच यूट्यूबवरही त्याला अनेक वेळा पाहण्यात आले आहे.
View this post on Instagram
टोनी कक्कड आणि त्याची बहीण नेहा कक्कड़ यांनी शोना शोना हे गाणे गायले होते. सिद्धार्थ-शहनाज यांच्या केमिस्ट्रीमुळे हे गाणे हिट झाले. आता एका परदेशी गायकाने गाण्याचे इंग्लिश व्हर्जन तयार केले आहे.
गायिका एम्मा हेस्टर्सने हे गाणे गायले आहे. “शोना शोना’च्या या इंग्लिश व्हर्जनला यूट्यूबवर खूप प्रसिद्धी मिळत आहे. एका दिवसांतच सुमारे 2 लाखांपेक्षा अधिकवेळा ते पाहण्यात आले आहे. तसेच या व्हिडिओला 30 हजार लाइक्स मिळाले आहेत. यापूर्वी तिने आपल्या यूट्यूबवर हार्डी संधूच्या “तितलिया’ गाणे इंग्रजीत गायले होते.
View this post on Instagram
इतकेच नव्हे तर एम्मा हिस्टर्सच्या या गाण्यावर चाहत्यांकडून बऱ्याच कमेंट्स येत आहेत. तसेच तिच्या “शोना मेरे शोना’ म्हणण्याच्या शैलीनेही चाहत्यांना भुरळ घातली आहे. कमेंट बॉक्समध्ये तिच्या गाण्याचे तोंडभरून कौतुक होत आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, सिद्धार्थ-शहनाज यांच्या “शोना शोना’ गाण्यालाही तब्बल 6 कोटी 76 लाखांपेक्षा अधिकवेळा पाहण्यात आले आहे. हे गाणे 25 नोव्हेंबरला यूट्यूब चॅनवर रिलीज करण्यात आले होते. पण एम्मा हिस्टर्सचा हा नवीन प्रयोग चाहत्यांना खूपच आवडला आहे.