मुंबई – मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने स्वत: चे असे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अनेक मराठी चित्रपटात तिने अफलातून काम केले आहे. लवकरच सोनाली एका मल्याळम चित्रपटात झळकणार आहे. नुकतेच तिने पहिल्या दाक्षिणात्य चित्रपटाचा पहिला लुक सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सोनालीने शेअर केलल्या या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये डोंगर, नदी, झाडे दिसत आहेत. याशिवाय मोठ्या पावलांचे तीन ठसेही पाहायला मिळत आहे. हे पोस्टर शेअर करताच अनेकांच्या पसंतीस पडले असून अनेकजण सोनालीच्या या नव्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. सोनालीने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मल्याळम चित्रपटात काम करणार असल्याची माहिती सर्वांना दिली होती.
सोनालीच्या मल्याळम चित्रपटाचे नाव ‘मलाइकोकटाई वालीबन’ असे आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल यांच्याबरोबर सोनाली स्क्रीन शेअर करणार मात्र हा चित्रपट कोणत्या विषयावर आधारित आहे. तसेच हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
View this post on Instagram
दरम्यान, सोनाली सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती फॅन्ससोबत शेअर करत असते. आपल्या आगामी प्रोजेक्टची माहिती ते चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. सोनालीला खरी ओळख मिळाली ती दिग्दर्शक रवी जाधव यांच्या ‘नटरंग’ या चित्रपटातून. या चित्रपटातील ‘अप्सरा आली’ या गाण्यातून तिचे मनमोहक सौंदर्य आणि नृत्याविष्कार पाहून अवघ्या महाराष्ट्राला तिने वेडं लावले आहे.