पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड महापालिका वृक्ष प्राधिकरण यांच्या वतीने आयोजित केलेल्या रानजाई महोत्सवाला अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी सायंकाळच्या सत्रात विशेष उपस्थिती दर्शवली.यावेळी कुलकर्णी यांनी या महोत्सवामुळे आपले शहर स्वच्छ, सुंदर ठेवण्यासाठी तसेच शहरात ठिकठिकाणी झाडे लावण्यासाठी नागरिकांना निश्चितच प्रोत्साहान देखील मिळेल, असे मत व्यक्त केले.
निगडी, प्राधिकरण येथील नियोजित महापौर निवास मोकळ्या मैदानात 27 वे भव्य ‘फळ-फुले भाजीपाला बागा प्रदर्शन व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद भेटत आहे.
दरम्यान, महोत्सवाला प्रसिद्ध शिल्पकार भगवान रामपुरे यांनी उद्याने व शिल्पकला प्रात्याक्षिके दाखवत,उपस्थितांना मार्गदर्शनही केले. यानंतर ख्यातनाम गायक रामदास यांचा मंत्रमुग्ध करणारा नादब्रम्ह संगीत संध्या हा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अक्षय घोळवे यांनी केले. प्रफुल्ल पुराणिक आणि रमेश भोसले यांनी सूत्रसंचालन केले.