जीनिव्हा – युएफा चॅम्पियन्स लीग, युरोप लीग व इंग्लिश प्रीमिअर लीग या मानाच्या फुटबॉल स्पर्धांच्या आयोजनाबाबत पुढील आठवड्याच्या प्रारंभ निर्णय घेण्यात येणार असल्याचे युरोपीय फुटबॉल महासंघाने जाहीर केले आहे.
करोनाचा धोका वाढल्याने युरोपमधील जवळपास सर्वच स्पर्धा स्थगित करण्यात आल्या तसेच काही स्पर्धा रद्द केल्या गेल्या तर काही लांबणीवर टाकण्यात आल्या. या स्पर्धांच्या संयोजन समित्या आयोजनासाठी ठिकाण, मैदाने व अन्य निर्णय घेण्यासाठी पुढील आठवड्यात बैठक घेणार आहेत.