वरून धवनच्या लग्नातील अदा; पिळदार बॉडी आणि अंगाला हळद

बॉलीवूड अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल लवकरच विवाहबंधनात अडकले आहेत. या दाम्पत्याने 24 जानेवारी रोजी सात फेरे घेतले आहे. सध्या सोशल मीडियावर वरुण आणि नताशा यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहे. त्यातच वरुण काही दिवसांपासून लग्नाचे काही फोटो पोस्ट करत आहे.

आता त्याने हळदी सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. ज्यात वरुणला हळदी लावल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करत त्याने लिहिले की, “हळदी व्यवस्थित लागली.’ तसेच अन्य एका फोटोत वरुणच्या बॉडीवर हळद लागलेली दिसत आहे. यात तो सनग्लासेससह आपले मसल्स दाखविताना दिसत आहे. अन्य काही फोटोंमध्ये वरुणसोबत त्याचे मित्रही दिसत आहेत. 

ज्यांनी वरुणच्या चित्रपटातील त्याच्या भूमिकांचे नाव असलेले व्हाइट कलरचे टीशर्ट घातलेले आहेत. वरुणचे हे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत. यावर असंख्य चाहत्यांनी कमेंट केला असून अनेकांनी हे फोटो रि-पोस्ट केले आहेत. दरम्यान, वरुण धवनचा शाही लग्नसोहळा मुंबई जवळील अलीबाग येथे पार पडला आहे. यावेळी बॉलीवूडमधील अनेक स्टार कलाकार हजेरी लावली होती.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.