फ्लिपकार्टचा किराणा क्षेत्रात विस्तार

बंगळुरू – फ्लिपकार्टने किराणा सेवेचा विस्तार 50 हून अधिक शहरांमध्ये केला आहे. यामुळे सात महानगरे आणि आसपासच्या 40 हून अधिक शहरांमधील वापरकर्त्यांना सेवा मिळणार आहे.
कोलकाता, पुणे आणि अहमदाबाद, मैसुर, कानपूर, वारांगल, अलाहाबाद, अलिगढ, जयपूर, चंडिगढ, राजकोट, बडोदे, वेल्लोर, तिरुपती आणि दमण या शहरात सेवा सुरू करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे.

कोव्हीडमुळे लोक ई-कॉमर्सकडे वळले व ग्राहकांकडून येणाऱ्या ई-ग्रोसरीच्या मागणीत वाढ झाली. ही वाढ फक्त महानगरांमध्ये नाही, तर द्वितीय श्रेणी शहरे आणि त्या पलिकडेही आहे.
फ्लिपकाटचे उपाध्यक्ष मनिष कुमार म्हणाले, मागील वर्षभरात द्वितीय श्रेणी शहरांतील किराणा सामानाची मागणी वाढत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे.

आजघडीला फ्लिपकार्ट ग्रोसरीत 7000 हून अधिक उत्पादने उपलब्ध आहेत. कंपनीच्या ग्रोसरी व्यवसायामुळे स्थानिक अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना मिळेल, शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाधारित बाजारपेठेच्या माध्यमातून लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचता येईल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.