नवी दिल्ली – तुम्हीही गुगल क्रोम ब्राउझर वापरत असाल तर तुमच्यासाठी एक अलर्ट आहे. इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने म्हटले आहे की क्रोम ब्राउझरमध्ये अनेक त्रुटी आहेत ज्या तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात. CERT-In या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या एजन्सीने क्रोम ब्राउझरबाबत उच्च-स्तरीय चेतावणी जारी केली आहे. सरकारने म्हटले आहे की क्रोमच्या विशिष्ट आवृत्तीमध्ये सुरक्षा त्रुटी आहे जी क्रोमच्या विंडोज (Windows) आणि मॅक (Mac) दोन्ही आवृत्तींमध्ये आहे.
CERT-In ने आपल्या चेतावणीमध्ये म्हटले आहे की क्रोममधील या त्रुटीचा फायदा घेऊन हॅकर्स सिस्टम हॅक करू शकतात आणि वैयक्तिक माहिती चोरू शकतात. याशिवाय, या त्रुटीचा फायदा घेऊन, वापरकर्त्यांच्या सिस्टममध्ये मालवेअर देखील स्थापित केले जाऊ शकतात.
गुगल क्रोमबाबत एजन्सीने म्हटले आहे की, यामध्ये अनेक त्रुटी आहेत ज्यामुळे तुमच्या कॉम्प्युटरचे नियंत्रण हॅकर्सच्या हाती येऊ शकते. या त्रुटींच्या मदतीने हॅकर्सना हे देखील कळू शकते की तुमच्या ब्राउझरमध्ये कोणते पेमेंट एपीई आहे. क्रोममध्ये, या कमतरता प्रॉम्प्ट्स, वेब पेमेंट API, SwiftShader, Vulkan, Video आणि WebRTC मध्ये आहेत. या त्रुटींच्या मदतीने हॅकर्सना रिअल टाइममध्येही ट्रॅक करता येऊ शकते.
CERT-In च्या मते, Chrome मध्ये या त्रुटी आहेत
CVE-2023-4068
CVE-2023-4069
CVE-2023-4070
CVE-2023-4071
CVE-2023-4072
CVE-2023-4073
OVE-2023-4074
CVE-2023-4075
CVE-2023-4076
CVE-2023-4077
CVE-2023-4078
CERT-In नुसार, Linux आणि Mac साठी गुगल क्रोमच्या 115.0.5790.170 आणि पूर्वीच्या आवृत्त्यांमध्ये दोष आहे. दुसरीकडे, Windows साठी क्रोमची 115.0.5790.170/.171 आणि पूर्वीची आवृत्ती धोकादायक आहे. एजन्सीने म्हटले आहे की या त्रुटी टाळण्यासाठी, त्वरित प्रभावाने तुमचा गुगल क्रोम ब्राउझर अपडेट करा.
कसे अपडेट करावे ?
तुमच्या संगणकावर किंवा लॅपटॉपवर क्रोम ब्राउझर उघडा. आता उजव्या बाजूला दिसणार्या तीन बिंदूंवर क्लिक करा. त्यानंतर खालील हेल्प बटणावर क्लिक करा आणि नंतर गुगल क्रोमवर जा. येथून तुम्ही तुमचे क्रोम अपडेट करू शकता.