जामखेड – शहरातील कान्होपात्रा नगर याठिकाणी एका पाच वर्षीय चिमुरडीवर शेजारी रहाणार्या विवाहित नराधमाने अत्याचार केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने रात्री उशिरा जामखेड पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सचिन शालन पवार वय ३२ याच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.
पोलिसांन कडून मिळालेली माहिती अशी की दोन दिवसांपुर्वी मंगळवार दि २१ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पिडीत चिमुरडी ही शेजारी रहाणार्या आरोपी सचिन शालन पवार वय ३२ वर्षे, रा कान्होपात्रा नगर, जामखेड याच्या घरी गेली आसता त्या ठिकाणी सदर आरोपीने तीच्या अंगावरील कपडे काढुन तीच्यावर बळजबरीने अत्याचार केला व यानंतर सदरची घटना तु कोणाला सांगितली तर मारण्याची धमकी दिली. सदरची घटना घडूनही भीतीपोटी पिडीत चिमुरडीने ही घटना कोणाला सांगितली नाही.
मात्र अत्याचार झाल्यावर चिमुरडीस त्रास होऊ लागल्याने तीने गुरुवार दि २३ रोजी ही घटना आपल्या आईस सांगितले त्यामुळे तात्काळ तीच्या आईने जामखेड पोलीस स्टेशनला धाव घेऊन फीर्याद दाखल केली. या वरुन सदर आरोपी विरोधात गुरुवार दि २३ रोजी रात्री उशिरा अत्याचार व बालकांचे लैंगिक अत्याचारा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेचा गुन्हा दाखल होत आसताना आरोपीच्या संबंधित नातेवाईकांनी कडुन पिडीत मुलीच्या आईवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्या दबावाला बळी न पडता पिडीत मुलीच्या आईने फीर्याद दाखल केली. सदरचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी सचिन शालन पवार यास रहात्या घरातुन ताब्यात घेऊन अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अवतारसिंग चव्हाण हे करत आहेत. .