मुंबई – मानुषी छिल्लर “मिस इंडिया 2017′ झाल्यापासून तिच्या बॉलिवूड पदार्पणाचे अंदाज वर्तवले जायला लागले होते. किमान वर्षभर तरी ती “मिस वर्ल्ड’च्या उपक्रमांमध्ये बिझी होती. त्यानंतर सलमानने तिला लॉंच करायचे ठरवले होते. दरम्यान, सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावरील ऐतिहासिक सिनेमामध्ये अक्षय आणि मानुषी लीड रोलमध्ये असणार आहेत. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली होणाऱ्या या सिनेमात संयुक्ताच्या रोलसाठी मानुषीला साईन करण्यात आले आहे.
राजा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असून अक्षय पृथ्वीराज चौहानच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं पहिल्यांदाच सुपरस्टार अक्षय कुमार एका ऐतिहासिक चित्रपटात भूमिका साकारत आहे.
या चित्रपटासाठी मानुषीनं अभिनयाचं प्रशिक्षणही घेतलं. नोव्हेंबर महिन्यात या चित्रपटाच्या सेटवर मुहूर्तपूजा करण्यात आली. चित्रपटाची संपूर्ण टीम मुहूर्तपूजेत सहभागी झाली होती. दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
दरम्यान, आदित्य चोप्राच्या मते मानुषीचा स्क्रीन प्रेजेंटेशन सेन्स खूप चांगला आहे. या ऐतिहासिक प्रेमकथेवरील चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी करणार आहेत.