नवी दिल्ली : इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स फेडरेशनच्या माजी अध्यक्ष आणि हॉटेल व्यावसायिक ज्योत्स्ना सुरी यांच्याकडे 24 कोटी रूपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडली.
ज्योत्स्ना सुरी आणि त्यांच्याशी संबंधीत आठ ठिकाणांवर सोमवारी प्राप्तीकर विभागाने धाड टाकली होती.
ज्योत्स्ना सुरी यांच्याकडे 71 लाख 50 हजार रुपयांची रोकड सापडली. त्याचा हिशेब त्यांना देता आला नाही. त्यांच्याकडून 23 कोटी रुपयांचे दागिने जप्त केले. 1.2 कोटी रुपयांची घड्याळे जप्त केली.
भारत हॉटेल्सचे व्यवस्थापकीय संचालक असणाऱ्या सुरी यांची ललीत हॉटेल्स या अलीशान हॉटेल्स समुहावरही मालकी आहे. सुरी यांचा सहकारी जयंत नंदा यांच्यावरही प्राप्तीकर विभागाचे लक्ष आहे.