पिंपरी -कोयते घेऊन दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना वाकड पोलिसांनी अटक केली आहेया प्रकरणी पोलीस शिपाई अजय अरुण फल्ले यांनी फिर्याद दिली आहे.
प्रमोद दयानंद कांबळे (वय 21) रा. सुयोग कॉलनी, रहाटणी, प्रफुल्ल राजू वाघमारे, (वय 21) रा. कैलासनगर, थेरगाव, पवन शहादेव जाधव (वय 21), रोहित शिंदे (वय 19) दोघेही रा. नखाते वस्ती, रहाटणी , राहुल कॅप्टन मोरे (वय 20) रा. अभंग कॉलनी, पिंपळे गुरव अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी मध्यरात्री वाकड स्मशानभूमी शेजारी अंधारात आरोपी दडून बसले होते. पोलिसांनी आरोपींना पकडून त्यांच्याकडून कोयते आणि दुचाकी जप्त केल्या आहेत.