मुंबई – टॉलीवूडसह बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी जागा बनवणारा बाहुबली म्हणजेच, अभिनेता ‘प्रभास’ बॉक्स ऑफिसवर नेहमीच जादू करतो. त्यामुळेच त्यांच्या चित्रपटातील डायलॉग आणि त्याच्या अभिनयाला सिनेप्रेक्षक तुफान दाद देत असतात.
दरम्यान, आज (दि. 10) प्रभासच्या आगामी ‘राधेश्याम’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये प्रभास आणि पूजा हेगडे दिसून येत आहे. ‘राधेश्याम’ मध्ये अभिनेत्री ‘पूजा हेगडे’ मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार यांनी केले असून 2021 मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.