वॉशिंग्टनमध्ये रस्त्यावर गोळीबार एकाचा मृत्यू, पाच जखमी

वॉशिंग्टन : वॉशिंग्टन डीसीमध्ये व्हाईट हाऊसपासून अवघ्या काही अंतरावर रस्त्यावर झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून, पाच जण जखमी झाले आहेत. अमेरिकी वेळेनुसार गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी रुग्णवाहिकेतून जखमी रुग्णांना रुग्णालयात नेले जात असल्याचे व्हिडिओ चित्रिकरण त्यांच्या वृत्तवाहिनीवरून प्रसारित केले आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा आला असून, हल्लेखोरांना चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.

एबीसी समुहाशी निगडीत ड्‌ब्ल्यूजेएलए टिव्ही ने ट्‌विटरवरून गोळीबारात जखमी झालेल्यांना रूग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असल्याची काही छायाचित्रे शेअर केली आहेत. शहरातील कोलंबिया स्ट्रीटवर घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रूग्णालयात दाखल केलं. स्थानिक वृत्तवाहिनी फॉक्‍स 5 ने दिलेल्या वृत्तानुसार, घटनास्थळी सहा जणांवर गोळीबार करण्यात आला आहे. वॉशिंग्टन डीसी ही अमेरिकेची राजधानी आहे. त्याचबरोबर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसपासून जवळच ही घटना घडली आहे. वॉशिंग्टन डीसीमध्ये गोळीबाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. 23 ऑगस्ट रोजी एकूण 112 जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षीच्या याच तारखेच्या तुलनेत गोळीबाराच्या घटनेत 14 टक्क्‌यांनी वाढ झाली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here