मुंबई- मुंबई शहरातील एका वीस मजली इमारतीला आग लागण्याची घटना समोर आली आहे. ही आग इमारतीच्या अठराव्या मजल्यावर लागली आहे. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशामन दलाच्या 13 गाड्या दाखल झाल्या आहेत सकाळी साडेसातच्या सुमारास ही आग ताडदेव भाटिया रुग्णालयाच्या बाजूच्या कमला या बहुमजली इमारतीला लागली यामध्ये आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत.
अग्निशमन दलाचे जवान कडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत याशिवाय इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुद्धा सुखरूप बाहेर काढण्यात येण्याचे काम चालू आहे. दरम्यान आगीची माहिती मिळताच घटनास्थळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर दाखल झाल्या आहेत.
जखमींना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान ही आग लेवल तीन चे असल्याची अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले आहे. आगीच्या ठिकाणी 13 फायर इंजिन सात जम्बो टँकरद्वारे आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.