मुंबई – मुंबई शहरातील एका रहिवासी इमारतीला मोठी आग लागली आहे. ओशिवरा परिसरातील आशियाना टॉवर नावाच्या इमारतीला ही आग लागली असून. आगी बाबत माहिती मिळाताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
#WATCH | Maharashtra: A level 2 fire broke out in Aashiyana Tower in Mumbai's Oshiwara, this morning. More details awaited. pic.twitter.com/zPufvpovmE
— ANI (@ANI) June 4, 2021
मुंबईतील ओशिवरा परिसातील आशियाना टॉवर ह्या रहिवासी इमारतीला आज सकाळी मोठी आग लागली आहे. इमारतीच्या पहिल्या-दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली असून आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत यामध्ये 8 फायर इंजिन, 8 वॉटर टँकर समावेश आहे. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे कसोशीचे प्रयत्न सुरु आहेत.