Shiv Sena UBT Canditates List| लोकसभा निवडणुकीसाठी अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे नेते आणि संजय राऊत यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे. राज्यभरातील 17 उमेदवारांची यादी शिवसेना ठाकरे गटानं जाहीर केली आहे.
यात ते म्हणालेत की, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे.
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे..
*मुंबई दक्षिण मध्य:श्री अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत आहे.
इतर 16 उमेदवार… pic.twitter.com/nPg2RHimSF— Sanjay Raut (@rautsanjay61) March 27, 2024
यात औरंगाबादमधून चंद्रकांत खैर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. रायगडमधून अनंत गिते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परभणीमधून संजय जाधव, बुलढाणातून नरेंद्र खेडेकर, मावळ संजोग वाघेरे, यवतमाळ वाशिममधून संजय देशमुख आणि सांगलीतून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर मुंबई दक्षिण मध्यमधून अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. संपूर्ण यादी पुढीलप्रमाणे-
ठाकरे गटाकडून कोणते उमेदवार उतरणार मैदानात?
सांगली -चंद्रहार पाटील
हिंगोली – नागेश पाटील आष्टीकर
छत्रपती संभाजीनगर – चंद्रकांत खैरे
धाराशिव – ओमराजे निंबाळकर
बुलढाणा – नरेंद्र खेडेकर
यवतमाळ-वाशिम – संजय देशमुख
नाशिक – राजाभाई वाजे
रायगड – अनंत गीते
मावळ – संजोग वाघेरे-पाटील
शिर्डी- भाऊसाहेबर वाघचौरे
परभणी – संजय जाधव
मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई
सिंधुदुर्ग-रत्नागिरी – विनायक राऊत
ठाणे – राजन विचारे
मुंबई-ईशान्य – संजय दिना पाटील
मुंबई-दक्षिण – अरविंद सावंत
मुंबई-वायव्य – अमोल कीर्तिकर.
हेही वाचा :
हत्ती वाढवणार भाजपचे टेन्शन ? मायावतींच्या खेळीमुळे बसपावरील भाजपची ‘B Team’ असल्याचा टॅग मिटणार?