#FIHProLeague24 (Women’s) : सलामीच्या लढतीतच चीनचा भारताला पराभवाचा धक्का…

FIH Pro League 2024 : भारतीय महिला संघ शनिवारी महिला FIH प्रो लीग 2023-24 च्या पहिल्या सामन्यात चीनविरुद्ध 2-1 असा पराभूत झाला. भारतीय महिला संघाकडून एकमेव गोल वंदना कटारिया (15वे मिनिट) यांनी केला, तर चीनच्या वेन डेन (40वे मिनिट) आणि गु बिंगफेंग (52वे मिनिट) यांनी त्यांच्या संघासाठी गोल केले. भारतीय महिला संघ आता रविवारी, 4 फेब्रुवारी रोजी रात्री 7.30 वाजता नेदरलँड्सविरुद्ध आपला पुढचा सामना खेळणार आहे.
A tough loss to take after a good start to the game.
It was a game to 2 halves, China cameback with 2 goals in the second half to win their first win against India in FIH Pro League.
China 🇨🇳 2 – India 🇮🇳 1
40′ DAN Wen
52′ GU Bingfeng15′ Vandana Kataria#HockeyIndia… pic.twitter.com/QI4LTsHanw
— Hockey India (@TheHockeyIndia) February 3, 2024
पहिल्या क्वार्टरच्या अखेरीस भारताने चीनविरुद्ध 1-0 अशी आघाडी घेतली होती, या काळात चीनच्या खेळाडूंनीही अनेक वेळा गोल करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते भारतीय बचावफळी भेदण्यात अपयशी ठरले. दुसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीच्या मिनिटांत चीनच्या खेळाडूंनी चांगली सुरुवात केली आणि दोन बॅक टू बॅक पेनल्टी कॉर्नर मिळवले, पण भारतीय महिला बचावफळीने त्यांचा डाव हाणून पाडला.अशाप्रकारे भारतीय संघाने अतिशय हुशारीने आपले वर्चस्व कायम राखत हाफ टाईमपर्यंत 1-0 अशी आघाडी कायम ठेवली होती.
हाफ टाईमनंतर दोन्ही संघ पुन्हा एकदा गोलच्या शोधात दिसले आणि सामन्याच्या 40व्या मिनिटाला चीनच्या डॅन वेनने मैदानी गोल करून आपले आणि संघाचे खाते उघडले. दरम्यान, त्यानंतर चीनच्या खेळाडूंनी आपले आक्रमण अधिक तीव्र करत 52 व्या मिनिटाला आणखी एक गोल करून सामन्यात 2-1 अशी आघाडी घेतली.
FIH Pro League 2024 : वंदना कटारियाचे महिला हॉकी संघात पुनरागमन, मिळाली मोठी जबाबदारी…
चीनच्या गु बिंगफेंगने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. मात्र, भारतीय महिला संघाने सामना संपेपर्यंत गोल करण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले, मात्र त्यांना यश आले नाही.





