#CWC19 : हॅरी केनने खेळला कोहलीशी सामना

लीड्‌स – क्रिकेटपटू अनेक वेळा सरावसत्रात फुटबॉल खेळण्याचा आनंद घेतात. पण एखाद्या ख्यातनाम व वलयांकित फुटबॉलपटूने “स्टार’ क्रिकेटपटूबरोबर बॅट व चेंडूचा आनंद घेतला असे क्वचितच घडते. येथे फिफा गोल्डनबूट विजेता हॅरी केन याने विराट कोहलीशी क्रिकेटचा अनुभव घेतला.

केन याने कोहली याला चेंडू टाकले तसेच त्याने फलंदाजीही केली. त्यानंतर त्याने कोहली याला आगामी सामन्यांकरिता शुभेच्छाही दिल्या. केन याने ट्‌विटरद्वारा म्हटले आहे की, लॉर्डसवर मला कोहलीशी खेळण्याची संधी मिळाली. हा माझ्यासाठी संस्मरणीय क्षण आहे. तो अतिशय महान खेळाडू आहे. महत्त्वाच्या सामन्यांमध्ये तो कोणतेही दडपण व घेता खेळतो. वैयक्तिक कामगिरीपेक्षाही संघासाठी तो खेळत असतो.

केनबरोबर झालेल्या सामन्याबाबत कोहली याने ट्‌विटरद्वारा म्हटले आहे की, केन हा श्रेष्ठ खेळाडू आहे. त्याच्याशी मला खेळण्याचे भाग्य लाभले यासारखा दुसरा आनंद नाही. तो क्रिकेटदेखील छान खेळतो. आम्ही बऱ्याच वेळा सराव सत्रात फुटबॉल खेळत असतो.अशा वेळी आम्हाला फुटबॉलमधील महान खेळाडूंची आठवण येत असते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here